मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आतापर्यंत युवासेनेने 10 पैकी 8 जागा जिंकल्या, शशिकांत झोरे यांची हॅट्ट्रिक

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत युवासेनेने विजयाचा झेंडा फडकवला आहे. युवासेनेचे राखीव मतदारसंघातील पाचही उमेदवार भरघोस मते घेऊन विजयी झाले आहेत. युवासेनेच्या शशिकांत झोरे यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. या विजयाने सत्ताधारी महायुतीचे धाबे दणाणले असून सिनेट निवडणूक स्थगित करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जोरदार झटका बसला आहे. आतापर्यंत युवासेनेने 10 पैकी 8 जागा जिंकल्या आहेत.

मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत शशिकांत झोरे, सौ. शीतल शेठ-देवरुखकर, मयूर पांचाळ, धनराज कोहचाडे, सौ. स्नेहा गवळी हे सर्व राखीव गटातून विजयी झाल्य आहेत. तर मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत युवासेनेचे खुल्या गटातील उमेदवार श्री. प्रदीप बाळकृष्ण सावंत हे पहिल्या पसंतीचे 1338 हून अधिक मते घेऊन सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. तसेच 1246 मते घेऊन मिलिंद साटम आणि अल्पेश भोईर विजयी 1137 मते घेत विजयी झाले आहेत.

प्रदीप सावंत आणि झोरे यांची हट्ट्रिक

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेचे प्रदीप सावंत हे सलग तिसर्‍यांदा भरघोस मताधिक्याने विजयी झाले आहेत. प्रदीप सावंत यांना पहिल्या पसंतीची 1338 आणि सर्वाधिक मते मिळाली. तर युवा सेनेचे शशिकांत झोरे यांनीदेखील भरघोस मते घेत सलग तिसरा विजय मिळवत हॅट्रीक केली.

DTNT प्रवर्ग
युवासेना – शशिकांत झोरे – 5247
अभाविप – अजिंक्य जाधव – 1066
SC प्रवर्ग
युवासेना – शीतल देवरूखकर – 5489
अभाविप – राजेंद्र सयगावकर – 1014
ST प्रवर्ग
युवासेना – धनराज कोहचाडे – 5247
अभाविप – निशा सावरा – 924
OBC प्रवर्ग
युवासेना – मयूर पांचाळ – 5350
अभाविप – राजेश भुजबळ – 888
महिला प्रवर्ग
युवासेना – स्नेहा गवळी – 5914
अभाविप – रेणुका ठाकूर – 893

खुला प्रवर्ग

युवासेना – प्रदीप सावंत – 1338
युवासेना – मिलिंद साटम – 1246
युवासेना – अ‍ॅड. अल्पेश भोईर – 1137
परमात्मा यादव –
किसन सावंत –

खुल्या प्रवर्गात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पाच तर चार अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, युवासेनेच्या पाचही उमेदवारांनी पहिल्या पसंतीची मते आणि विजयासाठी आवश्यक कोटा पूर्ण करीत दणदणीत विजय मिळवला.