महाराष्ट्र महाराजांचा अपमान सहन करणार नाही! गाण्याच्या माध्यमातून फडणवीसांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पुतळा कोसळून एक महिना पूर्ण झाला आहे. यादरम्यान महाराष्ट्र सरकारने पुतळा कोसळण्याची वेगवेगळी कारणे दिली. पण देवेंद्र फडणवीसांनी या दुःखद घटनेची माफी मागितली नाही. या दुःखद घटनेला एक महिना झाला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र काँग्रेसने या घटनेला एक गाण्याचा रूप देऊन प्रसारित केले आहे. तसेच या माध्यमातून महाराष्ट्र काँग्रेसने महाराष्ट्रच्या स्वाभिमानी बाण्याला जागा करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या भ्रष्टयुती सरकारवर घणाघात केला आहे.

महायुती सरकारने छत्रपती शिवरायांचा कशाप्रकारे अपमान केला आणि महाराष्ट्रातील लोकांची भावनिक अस्मिता दुखावली आहे, हे गाण्याच्या माध्यमातून दाखवले आहे. तसेच पुतळा पडण्यामागचे एकमात्र कारण म्हणजे सरकारचा हलगर्जीपणा व त्यांची भ्रष्ट निती आहे. यातून हे स्पष्ट होते की भाजप हे फक्त मतांसाठी महाराजांच्या नावाचा वापर करते, असे काँग्रेसने म्हटले आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या या गाण्यातून फडणवीसांनी केलेला महाराजांचा अपमान आणि त्यांची निष्क्रियता दाखवली आहे. तसेच फडणवीस हे मंत्री पदावर बसण्यायोग्या नाहीत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.