पावसाच्या तडाख्याने मुंबईत अनेक संसार उघड्यावर; शिवसेनेने दिला धीर, मदतीसाठी उचलले पाऊल

बुधवारी कोसळलेल्या परतीच्या पावसाने मुंबईकरांना तडाखा दिला. मुंबईतील अनेक वस्त्यांमध्ये, बाजारपेठांमध्ये पाणी शिरल्याने अतोनात नुकसान झाले. त्याचे भीषण वास्तव आज समोर आले. गंभीर बाब म्हणजे मुंबईकर रात्रभर पाऊसकाsंडीत फसले असताना पालिका आणि सरकारी यंत्रणा मात्र झोपेत होती. शिवसैनिकांनी रस्त्यांवर उतरून रहिवाशांना धीर दिला.

– भांडुपच्या बाबुराव पाटील कंपाऊंडमधील शिंदे मैदानासमोरील डोंगरावर भूस्खलन झाले. त्यात दरडीचा भाग घरावर कोसळून एक महिला जखमी झाली.

– कुर्ला येथे लाल बहादूर शास्त्राr मार्ग, अंधेरीत स्वामी विवेकानंद मार्ग, शिवडी, हिंदमाता या भागातही रस्त्यांवर पंबरभर पाणी तुंबले. अनेक झोपडपट्टय़ा रात्रभर पाण्यात होत्या. दादरमध्ये फुलबाजारात पाणी तुंबल्याने फुलांचा चिखल झाला. व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अंधेरी, जोगेश्वरीत पुराने अनेकांचे संसार रस्त्यावर आले.

– पाऊस थांबून 20 तास उलटून गेले तरी मानखुर्द, महाराष्ट्र नगर येथे रेल्वे रुळाखालील भुयारी मार्गात आठ ते दहा फूट पाणी होते.

जोगेश्वरीत घरात, दुकानांमध्ये पाणी शिरले, नुकसानभरपाईसाठी शिवसेनेने उठवला आवाज

सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची वस्ती असलेल्या जोगेश्वरी पूर्व विभागाला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. येथील अनेक घरांत आणि दुकानांत पाणी शिरून नागरिकांचे हाल झाले. धान्यासह अनेक वस्तू खराब झाल्याने आर्थिक भुर्दंड त्यांना सहन करावा लागला.

मुसळधार पावसामुळे जोगेश्वरी पूर्व येथील मजास नाला दुथडी भरून वाहत होता. या नाल्यालगत असलेल्या मेघवाडी, आदर्शनगर, गोणीनगर, टिळकवाडी, दवे पंपाऊंड, गांधीनगर, अंबिका नगर, महाराज भुवन, न्यू शामनगर तसेच नाथ पै चौक, नवलकर मार्पेट, चाचानगर, फ्रान्सिस वाडी, बांद्रेकरवाडी आदी ठिकाणी रस्त्यांवर मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. जोगेश्वरी विधानसभा संघटक, माजी नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी या ठिकाणांची पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच शिवसेना तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असे आश्वासन दिले.

त्यानंतर अनंत नर यांनी गुरुवारी उपनगरचे जिल्हाधिकारी यांना पत्र लिहिले असून जोगेश्वरी पूर्व विभागात अतिवृष्टीमुळे झालेल्या घर आणि दुकानांच्या नुकसानीची पाहणी करून नागरिकांना शासनाने तातडीने मदत करण्याची मागणी केली.