आजपासून अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट सेलचा महाधमाका

27 सप्टेंबरपासून अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल आणि फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल सुरू होत आहे. या दोन्ही सेलमध्ये ग्राहकांना स्वस्तात वस्तू खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांना आयपह्न, स्मार्टपह्न, स्मार्ट टीव्ही, टॅबलेट, लॅपटॉप यांसह अन्य इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने डिस्काऊंटसोबत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ग्राहकांना या दोन्ही सेलमध्ये निवडक बँकेच्या डेबिट आणि व्रेडिट कार्डवर 10 टक्क्यांपर्यंत सूट आणि ईएमआयची सुविधा मिळणार आहे. महागडय़ा स्मार्टपह्नवर 30 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकणार आहे.

डिस्काउंटची चढाओढ

फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या सेलमध्ये डिस्काउंट देण्याची चढाओढ पाहायला मिळेल. हे दोन्ही सेल प्राईम सदस्य असणाऱयांसाठी 26 सप्टेंबरपासून सुरू झाले आहेत. या सेलमध्ये प्रत्येक क@टेगरीच्या प्रोडक्टवर म्हणजेच, फॅशन, स्मार्ट डिव्हाइस, डिस्काउंट, बँक ऑफर्स, एक्सचेंज बोनस यासारखे ऑफर्स ग्राहकांना मिळणार आहे. तर अमेझॉन सेलमध्ये वॉशिंग मशीनवर 60 टक्के, फ्रीजवर 55 टक्के, एसीवर 55 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळेल, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.