डीआरडीओची जवानांना दिवाळीआधीच मोठी भेट, आयआयटी दिल्लीने तयार केले बुलेटप्रूफ जॅकेट

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आयआयटी दिल्लीच्या सहकार्याने ‘अभेद’ नावाचे हलके बुलेटप्रूफ जॅकेट विकसित केले आहे. हे जॅकेट पॉलिमर आणि देशी बोरॉन कार्बाइड सिरॅमिक मटेरियलपासून बनवले आहे. जॅकेटची रचना कोणत्याही प्रकारचा उच्च वेगाचा दाब सहन करू शकते. जॅकेटच्या प्रोटोका@लनुसार सर्व आवश्यक संशोधन आणि विकास चाचण्या झालेल्या आहेत. सर्वाधिक धोका परतवण्यास ‘अभेद’ सक्षम आहे. ‘अभेद’ म्हणजे अॅडव्हान्स बॅलिस्टिक फॉर हार्ड एनर्जी डिफीट. सैन्यदलाच्या गरजांनुसार या जॅकेटची निर्मिती करण्यात आलेय. 8.2 किलो आणि 9.5 किलोसह, मॉडय़ूलर-डिझाइन केलेले जॅकेट प्रंट आणि बॅक आर्मरसह 360 डिग्री सुरक्षा देईल. याची निर्मिती लवकरच करणार आहे.