ओबीसी आंदोलक प्रा. हाके, वाघमारे यांचे उपोषण सुटले

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या पाठोपाठ वडीगोद्री येथील सुरू असलेले ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांचे उपोषण आज सातव्या दिवशी उपोषण सुटले.

जालना येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत.प्रा. लक्ष्मण हाके बोलताना म्हणाले की, आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बेकायदा कृत्यांना रोखून कॅबिनेटचा निर्णय हैदराबाद गॅजेटचा निर्णय रोखण्यात यशस्वी झालो. या मुख्यमंत्र्यांवर आमचा काडीचाही विश्वास नसून, मुख्यमंत्र्यांनी जर पुन्हा असे काही करायचा प्रयत्न केला तर ’दुसरे आंदोलन उभारू, असा इशारा प्रा. हाके यांनी दिला.

‘पैसा पैसा’ सत्ता सत्ता याच्यापलीकडे महाराष्ट्रात अठरापगड जाती राहतात. मुख्यमंत्री म्हणून आम्हाला तुमची लाज वाटते. कोणीही उद्या मुख्यमंत्री झाले तर जोपर्यंत राज्य मागासवर्ग आयोग यांना मागास म्हणून जाहीर करत नाही तोपर्यंत जरांगे यांचे स्वप्न बाटलीतच बंद राहणार. महाराष्ट्रात फिरताना आमच्या जिवाला धोका असल्याचे प्रा.हाके यावेळी म्हणाले.