अंत्यसंस्काराठी स्मशानात तिरडी घेऊन जाताना ग्रामपंचायतीचा निषेध, वाढवणा खुर्द येथील घटना

उदगीर तालुक्यातील मौजे वाढवणा खुर्द येथे स्मशानभूमीत मृतदेह अंतिम संस्कारासाठी घेऊन जाताना रस्त्याच्या कारणावरून ग्रामपंचायतीचा निषेध करण्यात आला. उदगीर तालुक्यातील वाढवणा खुर्द येथील दलित समाजाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला. स्मशानभूमीकडे अंतिम संस्कारासाठी जाताना रस्ताच नसल्याने पाण्यातून, चिखलातून, काट्याकुट्यातून जावे लागते. ग्रामपंचायतीस अनेकदा विनंती करुन ही रस्त्याचे काम केले गेले नाही. आज एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना थेट ग्रामपंचायतीचा निषेध व्यक्त करत मृतांचे नातेवाईक जात होते.