छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला धक्का; दिनेश परदेशी यांचा शिवसेनेत प्रवेश, हाती घेतली ‘मशाल’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजपला धक्का दिला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते डॉ. दिनेश परदेशी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.

‘मातोश्री’ निवासस्थानी दिनेश परदेशी यांनी मशाल हाती घेतली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनगटावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर आणि इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.

हिंमत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला खतम करतो ते दाखवून देतो! उद्धव ठाकरेंचं आव्हान

कोण आहेत डॉ. दिनेश परदेशी?

1) 1996 ते 2001 – भाजपकडून वैजापूर नगर परिषदेवर उपाध्यक्षपदी नियुक्ती
2) 2001 ते 2006 – जनतेतून निवडणूक लढवून वैजापूर नगर परिषदेवर अध्यक्षपदी निवड
3) 2006 – 2011 – नगर परिषद निवडणूक लढवून नगराध्यक्ष पदी पाच वर्ष निवड.
4. 2011 ते 2016 – दिनेश परदेशी यांच्या पत्नी शिल्पा परदेशी यांची 5 वर्षांसाठी वैजापूर नगर परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
5) 2017 पासून जनतेमधून दिनेश परदेशी यांच्या पत्नी शिल्पा परदेशी यांची पाच वर्षांसाठी नगराध्यक्षपदी निवड
6) 2009 – वैजापूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविली आणि 41 हजार 227 मते मिळाली.
7) 2014 मध्ये काँग्रेसकडून पुन्हा विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी 45 हजार 346 मते मिळाली.
8) 2018 पासून भारतीय जनता पार्टी संभाजीनगर लोकसभा सह संयोजक पदाची जबाबदारी
9) 1997 ते 2000 मध्ये भारतीय जनता युवा मोर्चा तालुका अध्यक्ष
10) 2018 पासून छत्रपती संभाजीनगर जिल्हा सरचिटणीसपदी कार्यरत
11) 2019 पासून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक औरंगाबादच्या संचालकपदी कार्यरत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)