आयटीआय उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आयटीआय ट्रेड अप्रेंटिसच्या 437 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी 29 सप्टेंबर शेवटची तारीख आहे. यात इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक, टर्नर, मशिनिस्ट, सीओपीए, वेल्डर, पेंटर पदांसाठी भरती केली जाणार आहे. उमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षांपर्यंत असायला हवे. ओबीसी, एससी, एसटी वर्गासाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.