महिलांची बेरोजगारी वाढली, दर 2.9 टक्क्यांवरून 3.2 टक्क्यांवर पोहोचला

केंद्र सरकार देशातील बेरोजगारी कमी झाल्याचा दावा करत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. मागील वर्षभरात बेरोजगारीचा दर जैसे थे राहिलाय. याशिवाय महिलांमध्ये बेरोजगारी वाढल्याची चिंताजनक बाब समोर आलीय. सांख्यिकी मंत्रालयाने जुलै 2023 ते जून 2024 या कालावधीसाठी पीरिओडीक लेबर फोर्स सर्व्हे (पीएलएफएस)  अहवाल सोमवारी जारी केला. या अहवालाच्या माध्यमातून देशातील रोजगार आणि बेरोजगारांची आकडेवारी जाहीर केली जाते.  महिलांचा एलएफपीआर 2023-24 मध्ये वाढून 41.7 टक्के झाला आहे.

युवकांना रोजगार नाही

15 ते 29 या वयोगटातील युवा बेरोजगारीचा दर 2022-23 मध्ये 10 टक्क्यांनी वाढून 2023-24 मध्ये 10.2 टक्के झाला. महिलांसाठी हा दर 10.6 टक्क्यांनी वाढून 11 टक्के झाला. पुरुषांसाठी बेरोजगारीचा दर 9.7 टक्क्यांवरून 9.8 टक्के झाला.

u ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर कमी झाला आहे. 2017-18 मध्ये ग्रामीण भागातील बेरोजगारीचा दर 5.3 टक्क्यांनी कमी होऊन 2023-25 मध्ये 2.5 टक्के झाला. पुरुषांचा एलएफपीआर 2022-23 साली 78.5 टक्क्यांनी वाढून 78.8 टक्के झाला.