पुलवामा हल्ल्यातील आरोपी बिलालचा हार्ट अटॅकने मृत्यू, दहशतवाद्यांना दिला होता आश्रय

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 2019 मध्ये CRPF च्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यातील आरोपी बिलाल अहमद याचा ह्रदयविकाराचा झटक्याने सरकारी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय बिलाल अहमदला आजारी असल्यामुळे 17 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी (23 सप्टेंबर) रात्री ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. पाच वर्षांपूर्वी 2019 मध्ये पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यातील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतावद्यांना बीलाल अहमदसह इतर आरोपी शाकीर बाशील, इंशा जान आणि पीर तारिक अहमद यांनी घरामध्ये लपण्यासाठी मदत केली होती. या प्रकरणातील जैश-ए-मोहम्मद संघटनेचा संस्थापक मसूर अजहरसह अन्य सहा दहशतवादी अद्याप फरार आहेत.