प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचा एल्गार

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ, ग्रॅच्युईटी व दरमहा पेन्शन देण्याचे शासकीय आदेश विनाविलंबित निर्गमित झालेच पाहिजेत. या व अशा प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हजारो अंगणवाडी सेविकांनी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी अंगणवाडी सेविकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.