भरत राजाप्रमाणे चार महिने राज्यकारभार पाहणार, नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी स्वीकारला पदभार

Atishi Takes Charge As Chief Minister

दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी आज पदभार स्वीकारला. सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास त्या मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचल्या आणि औपचारिकता पूर्ण केली. आतिशी यांनी कार्यालयात एक रिकामी खुर्ची सोडली आणि स्वतः दुसऱया खुर्चीवर बसल्या. जोपर्यंत जनता अरविंद केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवत नाही तोपर्यंत मी भरत राजाप्रमाणे राज्यकारभार पाहणार असे त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा घालवली – भाजप

– आतिशी यांनी केलेल्या कृतीतून त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या प्रतिष्ठsसह दिल्लीतील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप दिल्ली भाजपचे जिल्हाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले. ही चमचेगिरी असून दिल्लीचे सरकार अशा रिमोट पंट्रोलने चालवणार का, याचे उत्तर केजरीवाल यांनी द्यावे, असे भाजपने म्हटले आहे.

माझ्याही मनात वेदना

आज माझ्या मनात तेच दुःख आहे जे प्रभू श्रीराम 14 वर्षांच्या वनवासात गेल्यावर भरताच्या मनात होते. भरत राजाने 14 वर्षे प्रभू श्रीरामाच्या सिंहासनावर पादुका ठेवून अयोध्येवर राज्य केले. त्याचप्रमाणे येत्या चार महिन्यांसाठी मी दिल्ली सरकार चालवणार आहे, असे आतिशी म्हणाल्या. एक वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू श्रीरामाने 14 वर्षांचा वनवास पत्करला. म्हणूनच आपण श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी मर्यादा आणि नैतिकतेचे उदाहरण आहे. त्याच पद्धतीने केजरीवाल यांनीही देशाच्या राजकारणात शिष्टाचार आणि नैतिकतेचा आदर्श घालून दिल्याचे आतिशी यांनी सांगितले.