संकेत बट्टूला सुवर्णपदक

विद्याविहार पूर्वेच्या सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या वतीने पार पडलेल्या दीक्षान्त समारंभात सोमैया स्पोर्टस् अकादमी संस्थेच्या वतीने संकेत बट्टूला स्पोर्टस् अँड एक्सरसाइज सायन्समध्ये सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. त्याने या विषयात अव्वल क्रमांक प्राप्त केल्याबद्दल त्याला सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले होते. या समारंभात डीएसआयआरच्या सचिव आणि सीएसआयआरच्या महासंचालिका डॉ. नल्लाथंबी कलैसेल्वी, पुलसचिव नंदपुमार गिलके, पुलपती समीर सोमय्या, सोमय्या स्पोर्टस् अकादमीचे संचालक एजाझ खान, सहाय्यक प्राध्यापक डॉ. नितीन खानविलकर उपस्थित होते.