बिग बॉस मराठी 70 दिवसात संपणार, या दिवशी होणार ग्रँड फिनाले

बिग बॉस मराठी चा पाचवा सिझन हा सुरू होऊन 54 दिवस झाले आहेत. यंदा या शो ने जोरदार सुरुवात केली व टीआरपीचे अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. एकीकडे हा शो गाजत असताना बिग बॉसने मात्र या शोच्या बाबतीत एक मोठा निर्णय घेतला आहे. बिग बॉस मराठीचे यंदाचे पर्व हे सुरुवातील 100 दिवसाचे असल्याचे जाहीर केले होते मात्र आता हा हा शो 70 दिवसात संपणार असल्याचे बिग बॉसने जाहीर केले आहे. आजच्या शो मध्ये बिग बॉसने ही घोषणा केली आहे.

सध्या बिग बॉस मराठीच्या घरात अंकिता प्रभू वालावलकर, अभिजीत सावंत, धनंजय पवार, वर्षा उजगावकर, पंढरीनाथ कांबळे, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण हे स्पर्धक घरात राहिले आहेत. नुकताच अरबाज पटेल व वाईल्ड कार्डमधून घरात आलेले संग्राम पटेल घराबाहेर पडला आहे. त्यामुळे सध्या घरात आठ सदस्य आहेत. हे सदस्य आता जिंकण्यासाठी जिवाचं रान करणार आहेत.

आता घराचे 54 दिवस झाले असून आता फिनालेला अवघे दोन आठवडे उरले आहेत. बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले हा 6 ऑक्टोबरला होणार आहे.