‘मेक इन इंडिया’ फक्त नावाला आहे का? हिंदुस्थानात तयार होऊनही आयफोन 16 महाग

हिंदुस्थानात आयफोन 16 बनवल्यानंतर ग्राहकांना स्वस्त किंमतीत उपलब्ध होईल, अशी अनेकांना अपेक्षा होती. परंतु, आयफोन 16 सीरीजची प्रत्यक्षात विक्री सुरू झाल्यापासून ग्राहकांची ही अपेक्षा फोल ठरली आहे. मेक इन इंडिया अंतर्गत आयफोनची निर्मिती हिंदुस्थानात करूनही आयफोन इतर देशांच्या तुलनेत महाग मिळत आहेत. त्यामुळे मेक इन इंडिया फक्त नावालाच आहे का?, असा संतप्त सवाल आता यूजर्स सोशल मीडियावरून करू लागले आहेत. अमेरिका, यूएई, व्हिएतनाम, थायलंड, मलेशिया या देशांसह अनेक देशांच्या तुलनेत आयफोन 16 हिंदुस्थानात महाग मिळत आहेत. आयफोनवर केंद्र सरकारने 18 टक्के जीएसटी लावला आहे.

आयफोन हिंदुस्थान अमेरिका यूएई व्हिएतनाम थायलंड मलेशिया
आयफोन 16 79,900 66,700 77,252 78,031 75,806 82,799
आयफोन 16 प्लस 89,900 75,048 86,344 88,210 88,482 93,151
आयफोन 16 प्रो 1,19,400 83,396 97,708 98,388 1,01,159 1,03,504
आयफोन 16 प्रो मॅक्स 1,44,900 100,093 1,15,890 1,18,745 1,23,977 1,24,209