देशात आढळला Mpox या विषाणूच्या Clade 1b प्रकारातील पहिला रुग्ण

हिंदुस्थानात Mpox या विषाणूच्या Clade 1b प्रकारातील पहिला रुग्ण आढळून आला आहे. केरळच्या मल्लपूरम जिल्ह्यात हा रुग्ण आढळून आला असून तो नुकताच संयुक्त अरब अमीरातीहून (UAE) हिंदुस्थानात आला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, हा 38 वर्षीय रुग्ण काही दिवसांपूर्वीच संयुक्त अरब अमिरातीहून केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात आला होता. मात्र त्याची प्रकृती ठीक नव्हती. त्याला ताप आला होता तसेच त्यांच्या अंगावर कांजण्यासारखे पुरळ उठले होते. त्यामुळे डॉक्टरांना संशय आला आणि त्यांनी त्याचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून, त्याला मंकीपॉक्स या विषाणूच्या क्लेड 1B प्रकाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

हिंदुस्थानातील मंकीपॉक्सचा चा हा दुसरा रुग्ण आहे. यापूर्वी दिल्लीमध्ये पहिला रुग्ण आढळला होता. परंतु तो रुग्ण क्लेड-2 या प्रकारातील होता. मात्र केरळमध्ये आढळून आलेला रुग्ण हा WHO ने अतिप्राणघातक म्हणून जाहीर केलेल्या आणि वेगाने पसरणाऱ्या क्लेड 1b प्रकारातील आहे.