आठवड्याचे पहिले सत्र ठरले ऐतिहासिक, सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी उच्चांकावर बंद

आठवड्याचा पहिलाच दिवस हिंदुस्थानी शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी अंकावर बंद झाले. बँकिंग, ऑटो, FMCG आणि ऊर्जा या समभागांमध्ये खरेदीदारांनी चांगली खरेदी केल्यामुळे BSE सेन्सेक्स 384 अंकांची उसळी घेत 84,928 अंकांवर बंद झाला. तसेच निफ्टी 148 अंकांची उसळी घेत 25,939 अंकांवर बंद झाला.

शेअर बाजारात सेन्सेक्समधील 90 समभागांपैकी 21 समभागांमध्ये वाढ झाली. त्याचबरोबर 9 समभागांमध्ये घसरण पाहायला मिळाली. परंतु, शेअर बाजार विक्रमी पातळीवर बंद झाल्यामुळे बीएसईवर सुचीबद्ध असणाऱ्या समभागांचे मार्केट कॅप प्रथमच 476 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांकांवर बंद झाले. उद्या शेअर बाजारात नवा विक्रम होण्याची शक्यता आहे. BSE सेन्सेक्समध्ये 20 अंकांची वाढ झाली तर सेन्सेक्स 85,000 अंकांचा विक्रमी उच्चांक पार करेल, तर निफ्टी 44 अंकांनी वाढल्यास 26,000 अंकांचा ऐतिहासिक उच्चांक गाठेल.