तस्करी करणाऱ्या तिघांना अटक 

सोने आणि घडय़ाळ, हिरे तस्करीप्रकरणी सीमा शुल्क विभागाने गुन्हे नोंद केले. गुन्हे नोंद करून एपूण तिघांना अटक केली.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करीचे प्रकार होऊ नयेत सीमा शुल्क विभागाने खबरदारी घेतली आहे. शुक्रवार-शनिवारदरम्यान सीमा शुल्क विभागाच्या झोन- 3 ने विमानतळावर विशेष कारवाई केली व दुबईहून आलेल्या एका प्रवाशाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 24 पॅरेटचे 12 बार जप्त केले. त्याची किंमत सुमारे 97 लाख रुपये इतकी आहे. त्याने ट्राऊझरच्या पट्टय़ात ते सोन्याचे बार लपवून आणले होते. त्याच्या चौकशीत आणखी एका प्रवाशाचे नाव समोर आले. विमानात बसून प्रवास करणाऱ्या त्या प्रवाशाने ते सोने दिल्याचे त्याने सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला सांगितले. त्या प्रवाशालादेखील ताब्यात घेऊन अटक केली.

तसेच हाँगकाँग येथून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक प्रवासी आला. त्याच्याकडे 24 पॅरेट सोन्याचे कडे आणि महागडी घडय़ाळे, हिरे होते. तसेच त्याने सोन्याचा कडे आणि घडय़ाळ परिधान केले होते. त्याने बनियनच्या आतमध्ये विशिष्ट पोकळीमध्ये हिरे लपवले होते. तस्करीप्रकरणी त्या प्रवाशालादेखील अटक केली.