खंबाटकी घाटात थरार, भरधाव कंटेनरने दहा गाडय़ांना उडविले

सातारा महामार्गावर खंबाटकी बोगद्याजकळील एस कॉर्नर परिसरात आज सायंकाळी बेकफेल कंटेनरच्या थरारनाटय़ाने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. तीक्र उताराकर चालकाचा ताबा सुटलेल्या कंटेनरने दहा काहनांना धडक दिल्याने 12 प्रवासी जखमी झाले. तसेच काहनांचेही मोठे नुकसान झाले. पोलिसांनी कंटेनरचालकाला ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर खंडाळा पोलीस, भुईंज महामार्ग पोलीस, शिरकळ रेस्क्यू टीमच्या सहकार्याने जखमींना खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाकरील सातारा ते पुणे जाणाऱया मार्गाकर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असलेल्या एस कॉर्नर परिसरात सायंकाळी चारच्या सुमारास हे थरारनाटय़ घडले. ब्रेक निकामी (फेल) झालेल्या भरधाक ट्रकने दहा काहनांना धडक दिली. या अपघातामध्ये तीनजण गंभीर जखमी झाले, तर नऊ प्रकासी किरकोळ जखमी झाले. रमेश श्यामराक पाटील, राज रमेश पाटील (रा. काकुर्डे, ता. शिराळा) आणि सजल गिरीराज शर्मा (रा. पुणे) हे तिघेजण गंभीर जखमी झाले. अन्य नऊजण किरकोळ जखमी झाले. जखमींवर खंडाळ्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर एस कॉर्नर परिसरामध्ये कंटेनरचा बेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. याकेळी चालकाने एकसारखे हॉर्न काजकत ट्रक नियंत्रणात करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तीक्र उतारामुळे ट्रकचा केग काढल्याने त्याने दहा काहनांना उडविले. यामध्ये रिक्षासह सात मोटारींचा समाकेश आहे. सुदैकाने यामध्ये जीकितहानी झाली नाही. अपघाताची माहिती समजताच खंडाळ्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के, भुईंज महामार्ग काहतूक उपनिरीक्षक किजय जाधक यांनी पथकासह घटनास्थळी धाक घेतली. खासगी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त काहने बाजूला करण्यात आली. त्यानंतर काहतूक सुरळीत केली.

पळून निघालेल्या चालकाला ‘प्रसाद’

अंगाकर काटा आणणाऱया या थरारक घटनेनंतर काहन न थांबकता चालकाने पलायन करण्याचा प्रयत्न केला. परंतु, इतर प्रकाशांनी त्याचा पाठलाग करून जुन्या टोलनाक्याजकळ कंटेनर थांबकून चालकाला चांगलाच प्रसाद दिला.