45th Chess Olympiad – हिंदुस्थानच्या महिला संघाने जिंकले पहिले बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुवर्ण पदक

हिंदुस्थानच्या पुरुष संघाने सुवर्ण पदक जिंकल्यानंतर आता महिला संघाने सुद्धा बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये हिंदुस्थानला महिलांच्या विभागात पहिले सुवर्ण पदक पटकावून दिले आहे. अंतिम फेरीत अझरबैजानविरुद्ध दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल, डी हरिका यांनी विजयी कामगिरी केली, तर वैशाली रमेशबाबू यांना सामना बरोबरीत साडवण्यात यश आले.