Ind Vs Ban 1st Test – रविचंद्रन अश्विनचा डबल धमाका अन् टीम इंडियाचा बांगलादेशवर दणदणीत विजय

रविंचद्रन अश्विनने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये डबल धमाका करत टीम इंडियाच्या विजयात महत्वाची भुमिका बजावली. यामुळे चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह टीम इंडियाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Image

टीम इंडियाने बांगलादेशला जिंकण्यासाठी 515 धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेशी फलंदाजांच्या पायात टीम इंडियाच्या गोलदाजांनी चांगल्याच बेड्या घातल्या. रविचंद्रन अश्वनने दुसऱ्या डावात सर्वाधिक सहा विकेट घेत बांगलादेशचा अर्धा संघ तंबूत धाडला. याबरोबरच अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 37 वेळा पाच पेक्षा जास्त विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. अश्विनच्या जोडीला रवींद्र जडेजाने 3 आणि बुमराहने 1 विकेट घेत संघाचा विजय निश्चित केला. तसेच अश्विन एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा शतक आणि पाच विकेट घेणारा दुसरा अष्टैपेलू खेळाडू ठरला आहे. त्याने असा विक्रम आतापर्यंत 4 वेळा केला आहे. या क्रमवारित इयान बॉथमने सर्वाधिक पाच वेळा असा विक्रम केला आहे.

टीम इंडियाने आपल्या पहिल्या डावात 376 आणि दुसऱ्या डावात 287 धावा करत बांगलादेशला 515 धावांचे आव्हान दिले होते. परंतु रावळपिंडीमध्ये पाकिस्तानला पराभवाचं पाणी पाजणाऱ्या बांगलादेशच्या संघाला दोन्ही डावांमध्ये सुर गवसला नाही. त्यांचा पहिला डाव 149 या धावसंख्येवर आणि दुसरा डाव 234 या धावसंख्येवर संपूष्टात आला आणि टीम इंडियाने 280 धावांनी विजय साजरा केला.