अमर प्रीत सिंग नवे एअरचीफ मार्शल

एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांची हिंदुस्थानी हवाई दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे हवाई दलाचे प्रमुख एअर मार्शल विवेक राम चौधरी 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर अमर प्रीत सिंग पदभार स्वीकारतील. अमर प्रीत सिंग आतापर्यंत हवाई दलाचे उपप्रमुख या पदावर होते. त्यांना रोटरी विंग एअरक्राफ्टवर पाच हजार तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव आहे. यापूर्वी त्यांनी ऑपरेशनल फायटर स्क्वॉड्रन्स आणि फ्रंटलाइन एअर बेसचे नेतृत्वही केले आहे.