हिंदुस्थानच्या बुद्धिबळ संघाने 2022 साली जिंकलेला Nona Gaprindashvili Cup फेडरेशनने हरवला! वाचा सविस्तर…

चेन्नई येथे 2022 साली झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये हिंदुस्थानच्या संघाने Nona Gaprindashvili Cup जिंकला होता. मात्र आता हा कप फेडरेशनने हरवल्याचे वृत्त समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नई येथे 2022 साली झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये हिंदुस्थानच्या संघाने Nona Gaprindshvili Cup जिंकला होता. तेव्हापासून हा कप All India Chess Federation (AICF) कडे होता. मात्र आता ही ट्रॉफी हरवली आहे. AICF च्या अधिकाऱ्यांनी ट्रॉफी हरवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मागील स्पर्धा 2022 साली झाली होती. दोन वर्षांनंतर यावर्षी (2024) या स्पर्धेचे आयोजन बुडापेस्टमध्ये करण्यात आले आहे. ही स्पर्धा सध्या सुरू असून बुद्धिबळ जागतिक प्रशासकीय समीतीने AICF ला मेल करत ट्रॉफी परत करण्याची विनंती केली होती.

हिंदुस्थानी बुद्धिबळ महासंघाचे (AICF) सचिव देव ए पटेल यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, सध्या आम्हाला Gaprindashvili ट्रॉफीबद्दल माहिती नाही. आम्ही त्याचा शोध घेत आहोत आणि लवकरच आम्हाला ट्रॉफी शोधण्यात यश येईल, असे देव ए पटेल म्हणाले आहेत.