कॉलेजच्या बाथरुममध्ये आढळला छुपा कॅमेरा; विद्यार्थी आक्रमक, 21 वर्षांच्या आरोपीला अटक

बंगळुरू पासून काही अंतरावर असणाऱ्या एका कॉलेजमधील बाथरुममध्ये छुपा कॅमेरा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एका 21 वर्षीय विद्यार्थ्याला अटक केली आहे. यामुळे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले असून आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

बंगळुरू पासून काही अंतरावर असणाऱ्या एका नामांकित कॉलेजमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. मुलांच्या बाथरुममध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करत असताना काही विद्यार्थ्यांनी आरोपी विद्यार्थ्याला पाहिले आणि सदर घटना उघडकीस आली. 21 वर्षीय Computer Science च्या विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या सर्व प्रकरणामुळे विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत आरोपी विरोधात घोषणाबाजी केली व त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. विद्यार्थांचा आक्रमक पवित्रा पाहता आरोपीविरोधात कडक कारवाई करण्यात येईल असे, आश्वासन पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून हा विद्यार्थी बाथरुमध्ये लपून व्हिडीओ रिकोर्ड करत असल्याची माहिती, विद्यार्थ्यांनी दिली. तसेच त्याने काही व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर सुद्धा केले आहेत. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये 7-8 व्हिडीओ आढळून आले आहेत. अधिक तपास पोलीस करत आहेत.