किल्ले प्रतापगड राज्य संरक्षित स्मारक जाहीर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्याच्या धैर्याचे व तेजाचे प्रतीक असलेला ऐतिहासिक किल्ले प्रतापगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने आज घेतला आहे. राज्य सरकारने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.  त्यामुळे 8 हेक्टर आणि 64 चौरस फुटांचा किल्ल्याचा परिसर संरक्षित झालेला आहे. दरम्यान, प्रतापगड किल्ल्याची देखभाल करण्यासाठी राज्य सरकारने प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना यापूर्वीच केली आहे. या किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी सुमारे 200 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे.