बॉक्स ऑफिसवर हॉरर चित्रपटाची जादू

बॉक्स ऑफिसवर 2024 हे वर्ष हॉरर चित्रपटासाठी चांगले राहिले. बॉलीवूडसह पाच हॉरर चित्रपटाने केलेल्या चांगल्या कमाईमुळे चित्रपट निर्माते मालामाल झाले आहेत. या पाच चित्रपटांमध्ये हिंदी चित्रपट शैतान, मल्याळम चित्रपट ब्रमायुगम, अरनमनई 4, मुंज्या, स्त्री 2 या चित्रपटाने चांगला गल्ला जमवला आहे. सहा वर्षांनंतर सिनेमागृहात पुन्हा प्रदर्शित झालेल्या तुंबाड चित्रपटालाही प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली आहे.