केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)मध्ये 11 हजार 541 कॉन्स्टेबल पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार सीआरपीएफच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन 14 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात. यात पुरुष उमेदवारांची 11,299 तर महिलांसाठी 242 जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी किमान वय 18 ते 23 वर्षे असायला हवे. निवड झालेल्या उमेदवाराला 18 हजार ते 69,100 रुपयांपर्यंत पगार आहे.