आयफोन 16 खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्लीसह अनेक ठिकाणी अ‍ॅपल स्टोअरबाहेर तुफान गर्दी

हिंदुस्थानात आयफोन 16 आणि आयफोन 16 प्रो सीरिजच्या विक्रीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. नवीन आयफोन 16 सीरिज मॉडेलची प्री-बुकिंग 13 सप्टेंबरपासून सुरू झाली होती. ज्या ग्राहकांनी प्री-बुकिंग केली आहे त्या ग्राहकांना शुक्रवारी सकाळी 8 वाजेपासून आयफोन मिळणे सुरू झाले आहे. त्यामुळे प्री बुकिंग केलेल्या ग्राहकांनी आज सकाळपासूनच मुंबईतील बीकेसीमधील अॅपल स्टोअर आणि दिल्लीतली अॅपल साकेत स्टोअरच्या बाहेर गर्दी केली होती. आयफोन कधी एकदा हातात पडतोय यासाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांनी स्टोअरवर लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

आयफोन 16 आणि 16 प्रोची किंमत

आयफोन 16 – 128 जीबी – 79,900 रुपये

आयफोन 16 – 256 जीबी – 89,900 रुपये

आयफोन 16 – 512 जीबी – 1,09,900 रुपये

आयफोन 16 प्रो मॅक्स – 256 जीबी – 1,44,900 रुपये

आयफोन 16 प्रो मॅक्स – 512 जीबी – 1,64,900 रुपये

आयफोन 16 प्रो मॅक्स – 1 टीबी – 1,84,900 रुपये

आयफोन 16 प्लस-128 जीबी – 89,900 रुपये

आयफोन 16 प्लस-256 जीबी – 99,900 रुपये

आयफोन 16 प्लस-512 जीबी – 1,11,900 रुपये

आयफोन 16 प्रो – 128 जीबी – 1,19,900 रुपये

आयफोन 16 प्रो – 256 जीबी – 1,29,900 रुपये

आयफोन 16 प्रो – 512 जीबी – 1,49,900 रुपये

आयफोन 16 प्रो – 1 टीबी – 1,69,900 रुपये

खरेदीवर ऑफर्स

आयफोन 16 सीरिजचे फोन ऑनलाइन खरेदी करणाऱया ग्राहकांना बँकेकडून काही निवडक बँकेच्या क्रेडिट कार्डस्वर 5 हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. हा डिस्काउंट स्पेशल लाँच ऑफर अंतर्गत मिळत आहे. या ऑफर अंतर्गत अतिरिक्त कॅशबॅकचा लाभ ग्राहकांना मिळू शकतो. या ऑफर्समुळे आयफोन स्वस्तात खरेदी
करण्याची संधी ग्राहकांना मिळू शकते.

फोनची फीचर्स

आयफोन 16 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले, आयफोन 16 प्लसमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले, आयफोन 16 प्रोमध्ये 6.3 इंचाचा डिस्प्ले आणि आयफोन 16 प्रो मॅक्समध्ये 6.9 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. कंपनीने 16 सीरिजमध्ये लेटेस्ट ए 18 प्रोसेसर दिले आहे. जे पुढील महिन्यात येणारे आयओएस 18.1 अपडेट सोबत अॅपल इंटेलीजन्स फीचर्सला सपोर्ट करेल. फोनला पाच रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. यात टील, पिंक, अल्ट्रामरीन, पांढरा आणि काळ्या रंगाचा समावेश आहे. आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्समध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.