वन नेशन वन इलेक्शन म्हणजे आंबेडकरांनी घालून दिलेली लोकशाहीची चौकट समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल!

आपल्या देशात संघराज्य पद्धत आहे. मात्र देशात वन नेशन वन इलेक्शन आणून अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणणे हा भाजपचा डाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेली लोकशाही चौकट समूळ नष्ट करण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल आहे, अशी जोरार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘वन नेशन वन इलेक्शन’ या निवडणूक प्रक्रियेला मंजुरी दिली. आगामी अधिवेशनाबाबत याबाबतचे विधेयक संसदेमध्ये मांडले जाण्याची शक्यता आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला.

देशाची घटना बदलण्याच्या मनसुब्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. आता पुन्हा घटना बदलण्याचा प्रकार भाजप करत असून यामुळे त्यांचा छुपा अजेंडा समोर येत आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

भविष्यात ‘नो इलेक्शन’ हेच त्यांचे धोरण; संजय राऊत यांचा मोदी सरकारवर घणाघात

ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळलेल्या आहेत. त्यामुळे ते वन नेशन वन इलेक्शनची भाषा बोलतात हे आश्चर्यकारक आहे. मागे लोकसभा निवडणुकीत सात टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात आली. त्यातही गोंधळ झाला अशा परिस्थितीत वन नेशन वन इलेक्शन करणे शक्य आहे का? असा सवालही जयंत पाटील यांनी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)