अमिताभ बच्चन यांनी मागितली जाहीर माफी, व्हिडीओ केला शेअर; जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या कित्येत दशकापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. 80-90 च्या दशकामध्ये एकामागोमाग एक सुपरहिट झालेल्या चित्रपटांमुळे त्यांची क्रेझ अधिकच वाढली. मोठ्या पडद्यासह छोटा पडदाही बिग बी यांनी गाजवला. आज वयाच्या 81व्या वर्षीही ते मनोरंजनसृष्टीत कार्यरत असून चाहत्यांकडून त्यांना पूर्वीपेक्षा कांकनभर अधिकच प्रेम मिळत आहे. ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असून त्यांचे हिंदी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे. कधी कधी ते मराठीतही संवाद साधत असतात. सुपरस्टार असतानाही त्यांच्या स्वभावामध्ये नम्रपणा असल्याचे अनेकदा दिसून आले असून आताही त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत याची प्रचिती दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये बिग बी यांनी ‘मी कचरा करणार नाही’, असे मराठीत म्हणत चाहत्यांनाही कचरा न करण्याचे आवाहन केले होते. मात्र हा व्हिडीओ चित्रित करताना बिग बी यांच्याकडून एक चूक झाली होती. मित्रांनी सांगितल्यानंतर त्यांच्या ही चूक लक्षात आली आणि आता नव्याने एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी ती चूक सुधारली आहे. एवढेच नाही तर चुकीचे मराठी बोलल्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)


‘नमस्कार, मी अमिताभ बच्चन. काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडीओ केला होता. यात ‘मी कचरा करणार नाही’ असे म्हटले होते. हा व्हिडीओ मी मराठीतही केला होता. मात्र मराठी बोलताना मी कचरा या शब्दाचा चुकीचा उच्चार केला होता. माझे मित्र सुदेश भोसले यांनी ही चूक माझ्या निदर्शनास आणून दिली आणि उच्चार चुकीचा केल्याचे सांगितले. त्यामुळे मी हा व्हिडीओ पुन्हा करत आहे. मी कचरा करणार नाही’, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले.

दरम्यान, व्हिडीओसोबत त्यांनी एक कॅप्शनही दिले आहे. एक व्हिडीओमध्ये माझ्याकडून उच्चार चुकला होता आणि त्यामुळए परत एकदा व्हिडीओ करत आहे. माफ करा, असे बिग बी यांनी कॅप्शनमध्ये म्हणत माफी मागितली आहे. त्यांचा हा नम्रपणा पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)