America Federal Reserve Bank ची व्याजदरात कपात; आता RBI कर्जदारांना दिलासा देणार काय…

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँक या मध्यवर्ती बँकेने व्यज दरकपातीचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. य निर्णयाचा जगभरातील शेअर बाजारा आणि अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. या निर्णयामुळे अमेरिकेत गृह, वाहन कर्ज स्वस्त होणार आहे. तर तेतील गुंतवणूक आता शेअर बाजारा आणि सोन्याकडे प्राधान्याने होण्याची शक्यता आहे. आता भारतीय रिझर्व्ह बँकही करकपातीचा निर्णय घेत कर्जदारांना दिलासा देणार काय, अशा चर्चा सुरू आहेत.

अमेरिकेच्या मध्यवर्ती फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. फेडरल बँकेच्या या निर्णयामुळे आता अमेरिकेत कर्ज घेणे स्वस्त झाले आहे. अमेरिका हा देश आर्थिक महासत्ता असल्याने त्यांच्या आर्थिक निर्णयाचा परिणाम जगातील इतर देशांवरही होतो. त्यामुळे आता लवकरच इतरही देश आपल्या व्याजदरात कपात करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देशातील रिझर्व्ह बँकही करकपातीचा निर्णय घेत कर्जदारांना दिलासा देणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आरबीआय फेडरल बँकेच्या निर्णयाची प्रतीक्षा करत होती. त्यामुळे आता लवकरच होणाऱ्या चलनविषय धोरण समितीच्या बैठकीत व्याजदाराबाबत काय निर्णय होणार, आरबीआयदेखील कर्जदरात कपात करत दिलासा देणार काय, असे प्रश्न उपस्थित होत आहे. व्याजदरात कपात केल्यास कर्ज आणि कर्जावरील ईएमआय याचे दर कमी होतात. त्यामुळे कर्ज घेणाऱ्यांना फायदा होतो. त्यामुळे आरबीआयनेदेखील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा देशभरातून व्य़क्त होत आहे.

अमेरिकेन बँकेने या निर्णयानंतर जगभरात व्याजदरात कपात करण्यात येत असेल तर ही आपल्या देशासाठी फायद्याचे आहे. जगभरात व्याजदरात कपात झाल्यास हिंदुस्थानात गुंतवणुकीसाठी येणाऱ्या भांडवलात वाढ होणार आहे. जगभरातील देशांप्रमाणे आरबीआयलाही आपल्या धोरणात बदल करावा लागणार आहे. आरबीआयने आपल्या चलनविषयक धोरणात बदल केल्यास देशातील कर्जांचे व्याजदर कमी होऊ शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळू शकते. त्यामुळे आता आरबीआय काय निर्णय घेणार, याकडे शेअर बाजारासाह नागरिकांनाही याची उत्सुकता आहे.