गणेशमूर्तीवर दगड, चप्पल फेकली; खोटी माहिती शेअर करणाऱ्या केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांच्यावर FIR दाखल

कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील नागमंगला शहरात झालेल्या दोन गटातील संघर्षाची खोटी माहिती आणि बनावट फोटो शेअर केल्याप्रकरणी भाजप खासदार आणि केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मंड्या पोलिसांनी गणेशमूर्ती जप्त केल्याचा आरोप करंदलाजे यांनी केला होता.

देशविरोधी लोकांनी गणेशमूर्तीवर दगड आणि चप्पल फेकल्याचा दावाही करंदलाजे यांनी केला होता. मात्र त्यांनी शेअर केलेले फोटो सदर घटनेशी संबंधित नाहीत आणि त्यांची विधानं कायदा व सुव्यवस्थेला बाधू आणू शकतात असा आरोप त्यांच्याविरोधात करण्यात आला आहे.

काय होता दावा?

कर्नाटकातील मंड्या येथे आराध्य दैवत गणेशाची मूर्ती पोलिसांनी जप्त केली आहे. मिवडणुकीदरम्यान देशविरोधी लोकांनी गणेशमूर्तीवर दगड, चपला फेकल्या आणि 25 हून अधिक दुकानांना आग लावली. मुख्यमंत्रक्षी सिद्धरामय्या आणि एचएम परमेश्वर या गुन्हेगारांना संरक्षण देत असून त्यांच्यावर पांधरूण घालत आहेत, असा आरोप शोभा करंदलाजे यांनी केला होता.

यावेळी करंदलाजे यांनी पोलिसांवरही आगपाखड केली होती. पोमणके नसलेल्या पोलिसांनी गणेशमूर्ती पोलीस व्हॅनमधून नेली. कर्नाटकातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. नागमंगला येथील हिंसाचारावेळी पाकिस्तान समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्या. काँग्रेसच्या राजवटीमध्ये हिंदूंना उपेक्षित आणि अनाथ वाटत आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या.

विजय वडेट्टीवारांनी झोडपले!

दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनीही हे फोटो शेअर केले होते. याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी समाचार घेतला होता. खरं बोलायची हिम्मत असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी या घटनेमागील वास्तव जनतेसमोर सांगावे. आंदोलन सुरू असताना आंदोलन स्थळी गणरायाच्या मूर्तीला धक्का लागू नये म्हणून पोलिसांनी मूर्ती व्यवस्थित सांभाळून आपल्याकडे ठेवली. अर्ध सत्य बोलून धार्मिक भावना भडकावणे आणि धर्माच्या नावावर राज्यातील मतदारांना भूल देणे ही एकच कला भाजपला अवगत आहे. राजकीय स्वार्थासाठी भेटेल तिथे खोटं बोला, रेटून बोला. पण महाराष्ट्रातील जनता आता यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही. गणपती बाप्पा… सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी दे आणि आमच्या महाराष्ट्रात सुख शांती नांदू दे! असे ट्विट त्यांनी केले होते.