Champions Trophy 2025 – ICC चे पथक पाकिस्तानात, खेळाडूंच्या सुरक्षेसाठी करणार चौफेर तपासणी

Champions Trophy 2025 चे आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी आयसीसीच्या पाच अधिकाऱ्यांची एक टीम पाकिस्तानमधे आयोजनाची तयारी बघण्यासाठी दाखल झाली आहे.

Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार, ICC चे पाच अधिकारी मंगळवारी (17 सप्टेंबर) पाकिस्तानमध्ये दाखल झाले आहेत. हे अधिकारी चॅम्पयन्स ट्रॉफीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टींचा आढावा घेणार आहेत. त्याचबरोबर पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांची सुद्धा भेट घेण्याची शक्यता आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांचा विचार करता खेळाडूंच्या सुरक्षा महत्वाची आहे. त्यामुळे खेळाडू ज्या हॉटेलमध्ये राहणार आहेत त्या हॉटेलमधील सोई सुविधांची सुद्धा तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर 20 सप्टेंबर रोजी इस्लामाबाद आणि लोहारमध्ये जाऊन सर्व अधिकारी चाचपणी करणार आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी कराची, लाहोर आणि इस्लामाबाद येथील स्टेडियमची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी स्टेडियम आणि आजूबाजूच्या परिसराची सुरक्षा महत्वाची असणार आहे.