गोंदियात देवरी चिंचगड मार्गांवरील पूल खचला; वाहतूक बंद झाल्याने 50 गावांना फटका

गेल्या काही दिवसापासून विदर्भात दमदार पाऊस होत आहे. गोंदिया जिल्यातील काही तालुक्यांमध्ये सोमवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहे. तसेच अनेक मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक मंद गतीने सुरू आहे. देवरी तालुक्यातुन चिंचगडकडे जाणाऱ्या सालईटोला गावाजवळील पुल खचल्याने सुमारे 50 गावांना याचा फटका बसला आहे.

हा पूल अचानक खचल्याने देवरी चिंचगड रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे देवरीहून चिंचगडला जायचे असल्यास 50 ते 60 किलोमीटर अंतर ओलांडून जावे लागत आहे. त्यामुळे सुमारे 50 गावातील लोकांना मुख्यालयात जायचे असल्यास सुमारे 50 किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे.