सेबीच्या प्रमुख माधवी पुरी बुच यांच्याविरोधात सेबीच्या अधिकाऱयांनी मानसिक छळाची तक्रार केली होती; परंतु आता याप्रकरणी सेबीनेच यू-टर्न घेतल्याचे समोर आले आहे. कर्मचाऱयांकडून आलेल्या तक्रारींचे निवारण चर्चेद्वारे केले जाईल असे सेबीने म्हटले आहे. सेबीने आज याबाबतची माहिती दिली.
सर्व श्रेणीतील अधिकाऱयांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर सर्व मुद्दे पूर्णपणे अंतर्गत असल्याचे मान्य करण्यात आले आहे. हे सेबीच्या कालबद्ध चौकटीत हाताळले जातील, असे सेबी अर्थात बाजार नियामकाच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.