खेळापेक्षा वायफळ बडबडच जास्त!

पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमची बॅट वर्षभरापासून शांत आहे. त्यामुळे तो सध्या टीकेचा धनी ठरत आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार युनूस खाननेही पाकिस्तानी क्रिकेटपटूंना घरचा आहेर दिलाय. आमचे खेळाडू खेळतात कमी अन् वायफळ बडबडच अधिक करतात, अशा शब्दांत त्याने आपल्या खेळाडूंना सुनावले. पाकिस्तानमधील एका कार्यक्रमादरम्यान युनूस खानने आपल्या खेळाडूंची कानउघाडणी केली. बाबरच्या कर्णधार पदाबाबत युनूस खान म्हणाला, ‘‘बाबरने क्रिकेटवर लक्ष पेंद्रित करावे हाच सल्ला त्याला द्यावा वाटतोय. त्याने आपला खेळ सुधारला पाहिजे. तो त्या वेळच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक होता म्हणून त्याला कर्णधार बनवण्यात आले. मात्र आता त्याची कामगिरी समाधानकारक नाहीये. बाबर आणि इतर आघाडीच्या खेळाडूंनी मैदानावर चांगली कामगिरी केली तर त्याचे परिणाम सर्वांना दिसतील, असेही युनूस खानने सांगितले.