गुरुवारी, शुक्रवारी अंधेरीत पाणीपुरवठा बंद

के पूर्व आणि के पश्चिम विभागात निगमवाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे गुरुवारी रात्री 8 वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी 2 वाजेपर्यंत काही भागांचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

पालिकेच्या के पूर्व विभागातील वेरावली जलाशय-2 येथे 750 मिलीमीटर व्यासाच्या पार्ले वर्सेवा  निगमवाहिनीवरील चार झडपा बदलण्यात येणार आहेत. गुरुवारी रात्री 8 वाजल्यापासून शुक्रवारी दुपारी 2 वाजेदरम्यान हे काम केले जाणार आहे. त्यामुळे, या कालावधीदरम्यान के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

के पूर्व विभाग

महाकाली मार्ग, पूनम नगर, गोनी नगर, तक्षशिला, एमएमआरडीए, दुर्गा नगर, पेपर बॉक्स, मालपा डोंगरी, शेर ए पंजाब, बिंद्रा संपुल, हंजर नगर, गणेश नगर, शोभना परिसर, सुंदर नगर, गौतम नगर, मॉडर्न बेकरी, प्रजापूरपाडा, त्रिपाठी नगर, मुन्शी कॉलनी, बस्तीवाला कंपाऊंड, अचानक कॉलनी, कलेक्टर कंपाउंड, सारीपूत नगर, दुर्गानगर, मातोश्री क्लब येथे पाणीपुरवठा बंद राहील.

के पश्चिम विभाग

सी.डी. बर्फीवाला मार्ग, उपाश्रय गल्ली, स्वामी विवेकानंद मार्ग अंधेरी, दाऊद बाग, केव्हणी पाडा, धापुशेठ पाडा, मालकम बाग, अंधेरी मार्पेट, भर्डावाडी, नवरंग सिनेमाच्या मागे, अंधेरी गावठाण, आंब्रे गार्डन पंप व गझदर पंप, गिल्बर्ट हिलचा काही भाग, तीन नळ, गावदेवी डोंगरी मार्ग, उस्मानिया डेअरीचा काही भाग येथे पाणीपुरवठा बंद राहील.