मोदी म्हणतात लोक गुजरातला बदनाम करण्याची संधी सोडत नाहीत?

द्वेष आणि नकारात्मक दृष्टिकोन असलेले काही लोक हिंदुस्थान आणि गुजरातला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला.

देशाचं नेतृत्व करत असताना मोदींनी नेहमीच गुजरातला झुकतं माप देण्याचं धोरण ठेवलं आहे. मोदींचं हे गुजरात प्रेम आज पुन्हा उफाळून आलं. मोदींच्या हस्ते आज भुज-अहमदाबाद नमो भारत रॅपिड रेल्वे, पहिली वंदे भारत मेट्रो आणि पाच वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना ते विरोधी पक्षांवर घसरले. विरोधी पक्षांनी  गेल्या शंभर दिवसांत माझा सातत्याने अपमान केला. देश पुढे जात असताना काही लोक देशाची एकता आणि अखंडतेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना देशात दुही माजवायची आहे, असा राग मोदींनी आळवला. द्वेषाचे राजकारण करणारे हेच लोक हिंदुस्थानला आणि गुजरातला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीत, असे ते म्हणाले.