ताज हॉटेल हिंदुस्थानात नंबर वन

टाटा ग्रुपच्या ताज हॉटेलने नवा विक्रम रचला असून हिंदुस्थानातील नंबर वन कंपनी बनली आहे. ताज हॉटेल चालवणारी कंपनी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचे मार्केट कॅप 1 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या मार्केट कॅपपर्यंत पोहोचणारी ही हिंदुस्थानातील पहिली हॉस्पिटॅलिटी कंपनी ठरली आहे. या क्षेत्रातील ऑबेरॉय हॉटेल ही देशातील दुसऱया क्रमांकाची सर्वात मौल्यवान कंपनी आहे. ऑबेरॉय हॉटेल्सच्या मूळ कंपनीचे कॅप सुमारे 24,000 कोटी रुपये आहे. कोविडनंतर हिंदुस्थानातील विविध कंपन्यांनी नवी भरारी घेतली आहे. हिंदुस्थानातील सर्वात मोठी एअरलाईन इंडिगोने गेल्या वर्षी जूनमध्ये 1 लाख कोटी रुपयांच्या मार्पेट कॅपचा टप्पा गाठला होता. इंडिगोची मार्पेट कॅप लवकरच दुप्पट होऊ शकते. ताज हॉटेलच्या कंपनीने गेल्या आठवडयातच 1 लाख कोटी रुपयांचे मार्पेट कॅप गाठले. कंपनी संपुर्ण हिंदुस्थानात हॉटेल्सची संख्या वाढत असून त्यांचे ताज, सिलेक्शन, विवांता आणि गेटवे असे चार ब्रँड आहेत.