केरळमध्ये ‘निपाह’ची दहशत शाळा आणि कॉलेज बंद

केरळच्या मलाप्पुरममध्ये एका 23 वर्षीय तरुणाचा निपाह विषाणूच्या संसर्गाने मृत्यू झाला. यानंतर स्थानिक प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये मास्क बंधनकारक केला आहे. तसेच शाळा, कॉलेज बंद ठेवण्यास सांगितले आहे.

आरोग्य विभागाने रुग्णाच्या जवळच्या व्यक्तींचे ट्रेसिंग सुरू आहे. आतापर्यंत 151 जणांना आयसोलेट करण्यात आले आहे. आयसोलेशनमध्ये असलेल्या 5 जणांना देखील सौम्य लक्षणं आहेत.सध्या त्यांचे सॅम्पल्स देखील टेस्टींगला पाठवण्यात आले आहे. मृत व्यक्ती बेंगलूरूचा विद्यार्थी होता. नुकतेच त्याचे खाजगी रुग्णालयात निधन झाले. कोझिकोडे मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या टेस्टमध्ये त्याची निपाह वायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. थिरुवल्ली पंचायत 4 वॉर्डमध्ये प्रोटोकॉल लागू केले आहेत. पुढील आदेशापर्यंत स्थानिक थिएटर, शैक्षणिक संस्था बंद राहतील.