Hockey Asian Champions Trophy 2024 – हिंदुस्थानची फायनलमध्ये दणक्यात एंट्री, दक्षिण कोरियाचा उडवला धुव्वा

टीम इंडियाने आशियाई हॉकी अजिंक्यपद करंडक स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड कायम ठेवत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आज (16 सप्टेंबर) झालेल्या सेमी फायनलच्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण कोरियाचा 4-1 अशा फरकाने पराभव केला. टीम इंडिया फायनलमध्ये चीनविरुद्ध भिडणार आहे.

हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सेमिफायनलमध्ये विजय मिळवत स्पर्धेतील सहावा विजय साजरा केला. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने 19 व्या आणि 45 व्या मिनिटाला एक-एक गोल केला. त्याचबरोबर उत्तम सिंगने 13 व्या मिनिटाला आणि जरमनप्रीत सिंगने 32 व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयात महत्वाची भुमिका पार पाडली. दक्षिण कोरियाकडून एकमेव गोल यांग जिहून याने 33 व्या मिनिटाला केला.

टीम इंडियाची फायनलम मॅच उद्या (17 सप्टेंबर) चीनविरुद्ध होणार आहे. चीनने सेमी फायनलमध्ये पाकिस्ताचा 2-0 अशा फरकाने पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. चीनचा संघ प्रथमच आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी ठरला आहे.