प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबईत गणेशोत्सवादरम्यान राणे यांनी प्रक्षोभक विधान केले होते. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबईत संकल्प घरत यांनी सात दिवसांच्या गणपतीचे आयोजन केले होते. घरत यांनी या कार्यक्रमाची कुठलीही परवानगी घेतली नव्हती. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून घरत यांनी भाजप आमदार नितेश राणे यांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात नितेश राणे यांनी अल्पसंख्याकांविरोधात चिथावणीखोर भाषण केले होते.

राणे या सभेत म्हणाले की आता सर्वमधर्म समभाव आणि बंधुभाव विसरून जा, फक्त हिंदूंचा विचार करा. नाहीतर आपली अवस्था पाकिस्तान आणि बांग्लादेशमधल्या हिंदूसारखी होईल असे राणे म्हणाले. या प्रकरणी पोलिसांनी नितेश राणेंविरोधात भारतीय न्यायसंहिता 302 ( कुणा व्यक्तीच्या धार्मिक भावना दुखावणे) 315(2) (धमकी देणे) 352 (शांतता भंग करणे) अशी कलमे लावण्यात आली आहेत.