ढाणकीत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला केला रामराम; हाताला बांधले शिवबंधन

>> प्रसाद नायगावकर

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रत्येक पक्ष तयारीला लागले आहेत. तसेच भाजपतील अनेक आमदार, नेते पक्षाला रामराम करत घरवापसी करत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्यात ढाणकी येथे भाजपला मोठा धक्का बसला आहे. शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेनेत शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीआधी भाजपला धक्के बसत आहेत. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून जनमत महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे दिसून आले आहे. तसेच अनेक आमदार, नेते यांनाही जनमताचा कौल दिसून येत असल्याने अनेकजण भाजपला रामराम करत स्वगृही परतत आहेत. या शिवबंधन कार्यक्रमासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे,युवासेना जिल्हाप्रमुख विशाल पांडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाखा भरवाडे,शिवसेना विधानसभा प्रमुख भीमराव भालेराव,संपर्क प्रमुख अॅड.बळीराम मुटकुळे,राजू खामणेकर,सतीश नाईक,संजय कुंभरवार,गणेश नरवाडे,रमेश गायकवाड,रमेश पराते,एजाज पटेल,नितिन शिंदे,शिवाजी फाळके,रमेश होले,कांता वासमवार दिलीप नंदनवार यासह शिवसेना यूवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशासाठी विशेष संघटनात्मक काम शहर प्रमुख बंटी जाधव व युवासेना तालुकाप्रमुख संभाजी गोरटकर यांनी संघटन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले.