कॅनडातील हिंदुस्थानी विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले, स्टडी परमिटची मंजुरी 50 टक्क्यांनी कमी

कॅनडामध्ये शिकणाऱया हिंदुस्थानी विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. कॅनडाने स्टडी परमिटची मंजुरी 50 टक्क्यांनी कमी केली आहे. स्थलांतरित नागरिकांची संख्या कमी करण्यासाठी टडो सरकारने कडक पावले उचलली आहेत. त्यामुळे व्हिसा मंजुरीचा स्तर पुन्हा एकदा 2018 आणि 2019 च्या पातळीवर नेण्याचा अंदाज आहे.

यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत हिंदुस्थानी विद्यार्थ्यांची स्टडी परिमिटची मंजुरी निम्म्यावर आली आहे. अप्लाईबोर्ड नावाची एक कंपनी आहे. ही कंपनी जगभरातील विद्यार्थ्यांना जगभरातील विद्यापीठ आणि कॉलेजशी जोडते. असा अंदाज वर्तवण्यात येतोय की कॅनडात 2023 च्या तुलनेत 2024 च्या स्टडी परमिट मंजुरीत 39 टक्क्यांची घट होईल. त्यामुळे अन्य देशांतून कॅनडात शिकण्यासाठी जाऊ इच्छिणाऱया विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. पहिल्यासारखे कॅनडामध्ये आता आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे स्वागत होणार नाही.

स्टडी व्हिसा 50 टक्क्यांनी कमी होणार

 या कंपनीच्या अहवालानुसार, कॅनडामध्ये 2024 च्या अखेरपर्यंत स्टडी परमिटची संख्या 2 लाख 31 हजार पेक्षा थोडी कमी असेल. 2023 मध्ये 4 लाख 36 हजार स्टडी परमिट देण्यात आले होते.