जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घटल्याचा एनडीए सरकारचा दावा सातत्याने फोल ठरताना दिसत आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्या दिवसापासून दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. आज जम्मू-कश्मीरमधील राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. रविवारी मध्यरात्री झालेल्या घुसखोरीविरोधात जवानांनी मोठी कारवाई केली.
निवडणुकीसाठी सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर
जम्मू-कश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा निकाल 8 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.