आईच्या अंगावर पडलेली रिक्षा पाहून लेक धावली, शाळकरी मुलीच्या धाडसाचं होतंय कौतुक

आईच्या अंगावर पडलेली रिक्षा पाहून लेक धावली आणि नागरिकांच्या मदतीने रिक्षा उचलत आईचे प्राण वाचवले. कर्नाटकात घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सर्व स्तरातून मुलीच्या धाडसाचे कौतुक केले जात आहे.

सदर घटना कर्नाटकातील मंगळुरू शहरातील किन्नीगोली येथे घडली आहे. चेतना या आपल्या मुलीला क्लासमधून आणण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या मुलीकडे त्या जात होत्या. मात्र रस्ता क्रॉस करताना भरधाव वेगात असलेल्या रिक्षाने त्यांना जोरात धडक दिली आणि रिक्षा त्यांच्या अंगावर पडली. मुलीने तत्काळ धाव घेत क्षणाचाही विलंब न करता नागरिकांच्या मदतीने रिक्षा उचलली आणि आईचा जीव वाचवला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

या दुर्घटनेत चेतना यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचबरोबर रिक्षाचालक आणि अन्य एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून सर्व स्तरातून मुलीचे कौतुक केले जात आहे.