बुरखा वाटप करायचं शिंदेच्या भामट्यांनी…वा रे वा मिंधेची #जनाब_सेना! मिंध्यांवर नेटकऱ्यांचा हल्लाबोल

मिंधे गटाकडून मुंबईत मुस्लीम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहे. याचे पोस्टर्स मुंबईत ठिकठिकाणी लागले होते. ते पोस्टर्स शेअर करत सोशल मिडीयावरही नेटकऱ्यांनी मिंध्यांना चांगलेच झोडून काढले. बुरखा वाटप करायचं शिंदेच्या भामट्यांनी आणि हिंदूत्व सोडलं म्हणून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची…वा रे वा मिंधेची #जनाब_सेना अशा प्रकारच्या संतप्त भावना अनेकांनी सोशल मिडीयावर व्यक्त केल्या आहेत.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही याचा चांगलाच समाचार घेतला आहे. आता जनता मिंध्यांच्या 40 जणांना पायताणाने मारणार असल्याने आगामी निवडणुकीत त्यांना बुरख्यातच फिरावे लागेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. निवडणुका जिंकण्यासाठी ते काहीही करू शकतात. ते ढोंगी लोकं आहेत. मिंध्यांच्या महिला आमदार बुरखा वाटत आहेत, तर त्यांचे नेते नरेंद्र मोदी यांनी बुरख्याविरोधात प्रचार केला होता. शाळेत हिजाब, बुरखा घालून जाणाऱ्या विद्यार्थिनींवर हल्ले करण्यात आले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. मोदी बुरख्याविरोधात बोलत असताना मिंध्यांचे आमदार बुरखा वाटत आहेत, म्हणजेच हे ढोंगी आहेत, हे दिसून येते, असेही राऊत म्हणाले.