सशस्त्र दलांनी युद्धासाठी सज्ज राहावे, संरक्षणमंत्र्यांचा इशारा

rajnath-singh

रशिया-युक्रेन आणि इस्रायल-हमास संघर्ष, तसेच बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीचा दाखला देत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलांनी युद्धासाठी सज्ज राहावे, असा सूचक इशारा दिला आहे. वाढत्या आव्हानांमुळे सशस्त्र दलांनी सतत सतर्क राहाण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे झालेल्या पहिल्या जॉइंट कमांडर्स कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते.

‘सशक्त आणि सुरक्षित हिंदुस्थान, सशस्त्र दलांचे परिवर्तन’ या परिषदेत त्यांनी देशाची भूमिका मांडली. हिंदुस्थान शांतताप्रिय राष्ट्र असून शांतता टिकवून ठेवण्यासाठी सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार असणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.डेटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्ससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्याचे आवाहनही त्यांनी लष्करी नेतृत्वाला केले.