पोषण आहार विकताना मुख्याध्यापकास पकडले; निलंबित करण्याची मागणी

फाईल फोटो

वाकद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येलाच लाजीरवाणी कृत्य करीत विद्यार्थ्यांसाठी असणारे शालेय पोषण आहाराचे धान्य चोरताना त्यास पकडले. अश्पाक कादर शेख असे मुख्याध्यापकाचे नाव आहे.

वाकद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकपदी असलेला अश्पाक कादर शेख बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आलेला पोषण आहार तांदूळ चोरुन वाहनात टाकत असताना ग्रामस्थांना दिसले. त्यांनी तत्काळ शाळेकडे धाव घेतली. त्या भोजनाचे तांदूळ पिकअप गाडी ठिकाणी काही जण शाळेतील विद्यार्थ्यांचे पोषण आहार नंबर (एम एच 03 ए एच 3508) भरत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थ जमा झाले. केंद्रप्रमुख भिमसिंग बिंलगे यांना बोलविण्यात आले. सुरू असलेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणुन दिला व मुख्याध्यापकावर कारवाईची मागणी केली. रात्री 12:45 पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला. साठा खोलीत 17 हजार 629 रुपयांचे शासकीय तीन पोते व खासगी पॅकिंग गोण्या नऊ अशा बारा गोण्यांचे एकूण वजन 550 किलोग्रॅम असल्याचे सांगितले.

पिशोर पोलिसांनी मुद्देमालासह गाडी ताब्यात घेतली. मुख्याध्यापक अशपाक कादर शेख गाडीसोबत दोन व्यक्ती रमजान जमालखाँ पठाण व शेख इजाज शेख बन्नू दोघे राहणार घाटनांद्रा ता. सिल्लोड सदरील चोरीचे कृत्य करणाऱ्या व विकणाऱ्या दोषींवर पिशोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

मुख्याध्यापकाची जाऊ तेथे खाऊ वृत्ती
या प्रकरणी प्रभारी केंद्रप्रमुख भीमसिंग बिलंगे यांच्या या अगोदर शेख अशपाक मुख्याध्यापक म्हणून जैतखेडा येथे असताना 2018 शाळेचे भंगार, नवीन बॅच कट करून परस्पर विकले होते. 2022 ला तांदूळ व वाजविण्याचे टाळ देखील विकले. येथील ग्रामस्थांच्या ही बाब लक्षात येताच कारवाईची मागणी केली होती. प्रशासनाने मात्र केवळ बदली केली होती. फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. पिशोर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रतन डोहीफोडे, बिट जमादार किरण गंडे करीत आहेत.

पिशोर पोलीस स्टेशन येथे कृष्णा बोराडे, सरपंच वंदना कौतिक चिकटे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष मोरस्कर, कौतिक चिकटे, प्रकाश मनगटे, शालेय समिती अध्यक्ष विष्णू थोरात, उपाध्यक्ष प्रवीण चिकटे, सदस्य प्रताप जातोडे, योगेश मनगटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

मुख्याध्यापकाने केलेल्या अशा कृत्यामुळे ग्रामस्थांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात असून मुख्याध्यापकाला निलंबित करण्याची मागणी केली जात आहे. संतप्त ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले.